मेंढा वन कार्यआयोजना प्राथमिक मसुदा

मेंढा (लेखा) गामसभेने कोणत्याही शासकीय वा इतर बाह्य आर्थिक सहाय्याविना स्वयंस्फूर्तीने बनविलेला व अजून काही त्रुटी असतानाही सर्वांच्या माहितीसाठी नमुन्यादाखल उपलब्ध करून दिलेला मेंढा (लेखा) गावाच्या सामूहिक वनसंपत्तीच्या कार्यआयोजनेचा प्राथमिक मसुदा.

ही एक नमूना वन कार्यआयोजना आहें, अंतिम नाहीं. या मधे लोक अधिक भर घालून व मार्गदर्शिकेचा उपयोग करून नवीन वन कार्यआयोजना बनवू शकतात.

 महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर २०१६


मेंढा (लेखा) गावाच्या सामूहिक वनसंपत्तीची कार्यआयोजना

प्राथमिक नमुना मसुदा

इद गेळाता मालकाल बोर ? सरकारवने आयो, नारवने आयो, माटवने आयो. बोर मानेय अजुन जन्म वायोरे ओर मानेय असली मालक मंतोर.माट फक्त्त गेळातोर जतुन केवालोर आणि गरजे पुरता वापरे मासी मुनेटा पेळीतक कायमस्वरुपी पुटता पाहिजे इदेनासाठी व्यवस्थापन  केवालोर मानेयक .”       

या जंगलाचे मालक कोण ?.सरकारही नाही,गावही नाही,आम्हीही नाही.जो व्यक्त्ती अजून जन्मला नाही, ते व्यक्त्ती खरे मालक आहेत.आम्ही फक्त्त जंगलाचे व्यवस्थापन करणारे आणि गरजेपुरते वापरुन पुढील पिढीसाठी कायस्वरुपी मिळाला पाहिजे म्हणून याच्यासाठी व्यवस्थापन करणारे आम्ही                                 

-      श्री.दुक्कु चमरु तोफा